|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » केंद्राच्या निर्णयाचे समितीकडून स्वागत

केंद्राच्या निर्णयाचे समितीकडून स्वागत 

प्रतिनिधी/ सातारा

केंद्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाकडून किल्ले संवर्धनांचा राज्याला विशेषाधिकारी देवून टाकल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्या निर्णयाबाबत शिवराज्यभिषेक दिन उत्सव समिती आणि दुर्ग संमेलन समिती यांच्यावतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय व सांस्कृतिक मंत्री यांच्या अभिनंदनाचे एकमुखी ठरावही घेतले गेले. छत्रपती शिवरायांनी केलेल्या गडकोटांच्या संवर्धनासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱया शिवराज्यभिषेक दिन उत्सव समिती व दुर्ग संमेलन समितीला यश येवू लागले आहे.

साताऱयात शिवराज्यभिषेक दिन उत्सव समिती व दुर्ग संमेलनाच्या कार्यकर्त्यांची बैठक सुदाम (दादात) गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी दुर्ग संमेलनाचे निमंत्रक दीपक प्रभावळकर, सचिव महेश पाटील, अमित कुलकर्णी, शरद पवार, शेखर तोडकर, दीपक भिसे, गणेश ओंबाळे, डॉ. योगेश कुंभार, नीलेश ननावरे, अर्जुन मोहिते, राजू मोहिते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. त्यांनी स्वराज्यात तोरणापासून ते रायगडापर्यंत अनेक गडकोट उभे केले. या गडकोटांची अवस्था आता बिकट बनू लागली होती. या गडकोटांचे संवर्धन व्हावे, यासाठी शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने राज्यात दुर्ग संमेलन ही चळवळ सुरु केली गेली. पहिल्या सदाशिवगडाच्या संमेलनात केंद्रीय पुरातत्व खात्याने करुन ठेवलेल्या जाचक अटीमुळे गडकोटांचे संवर्धन करता येत नव्हते. त्या जाचक अटी रद्द कराव्यात असा ठराव घेतला होता.

समितीने वेळोवेळी केला होता पाठपुरवठा

शिवभक्त, दुर्गप्रेमींनी सर्वांनी तो तात्कालिन आघाडी शासनाकडे पाठवला होता. तत्कालिन शासनाकडे पाठपुरावाही समितीने सुरु ठेवला होता. दरम्यान, या समितीने विविध ठिकाणी दुर्ग संमेलन घेत गडकोटांचे संवर्धन झाले पाहिजे या विचारांची चळवळ रुजवत ठेवली. विद्यमान राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्यासोबतही राज्यातील गडकोट संवर्धनाच्या विषयावर समितीच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेवून पाठपुरावा सुरु ठेवला होता.

रायगडासाठी मिळणार 600 कोटीचा निधी

शासनाने अरबी समुद्रामध्ये जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यासोबत दुर्गराज रायगडासाठी करण्यात आलेली 600 कोटींची भरीव तरतूद केंद्रांकडून प्राप्त झालेले विशेषाधिकार प्राप्त झाले. याबाबत समितीकडून अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

Related posts: