|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काणकोणचे समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलू लागले

काणकोणचे समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलू लागले 

प्रतिनिधी/ काणकोण

नोटा बंदीमुळे झालेला काणकोण तालुक्यातील पर्यटन व्यवसायावरील परिणाम हळूहळू सुधारायला लागला असून सद्या तरी या तालुक्यातील सर्वच किनारपट्टय़ा परदेशी पर्यटकांनी फुलून गेल्याचे दिसत आहे. सुरवातीचे काही दिवस परदेशी पर्यटकांच्या बँका आणि एटीएम कडे रांगा लागल्याचे दिसायच्या मात्र सद्या परिस्थितीत सुधारणा झालेली आहे.

पाळोळे, होवरे येथील किनारपट्टय़ावरील सर्व शॅक्स आणि रेस्टॉरेंटस पर्यटकांच्या गर्दीने भरून गेली आहेत. समुद्र स्नानालाही मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसत आहे. पर्यटक टॅक्सींचाही व्यवसाय समाधानकार असा असल्याची माहिती काही टॅक्सी चालकांनी दिली.

सीआरझेडच्या जाचक नियमांमुळे यंदाच्या मोसमात काणकोण पालिका क्षेत्रातील एकाही पर्यटक कुटिरे किंवा शॅक्सना पालिकेने परवानी दिली नव्हती. मात्र सीआरझेडचा परवाना आणल्यास त्वरित ‘ना हरकत दाखला’ दिला जाईल असे मुख्याधिकारी केदार नाईक यानी सूचित केले होते. तरी देखील पालिकेचा महसूल बुडू नये यासाठी ज्या व्यावसायिकांनी पालिककडे फाईल्स सादर केल्या आहेत.  त्यांच्याकडून आतापर्यंत 35 लाख रू. इतका महसूल गोळा करण्यात आल्याची माहिती संबधितानी दिली आहे.

पाळोळे किनारपट्टीच्या प्रवेश द्वाराजवळ असलेल्या पार्किंगच्या जागेवर मात्र  टाकण्यात आलेला कचरा आठ-आठ दिवस तसाच टाकण्यात येत असल्याची तक्रार काही टॅक्सी चालकांनी केली. पालिकेची कचरा वाहने येतात मात्र साठवून ठेवलेला कचरा उकल होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

Related posts: