|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दूधसागर देवतांच्या वर्धापनदिनी भाविकांचा पूर

दूधसागर देवतांच्या वर्धापनदिनी भाविकांचा पूर 

प्रतिनिधी/ धारबांदोडा

गोमंतकीयांचे श्रद्धास्थान व जागृत दैवत श्री कलनाथ सातेरी दूधसागर देवतांच्या वर्धापनदिन भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला. देवतांच्या दर्शनासाठी मंदिरांच्या परिसरात भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण गोव्यातून तसेच शेजारील राज्यातून अनेक भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी सावर्डेचे आमदार गणेश गावकर, गोवा भाजपाध्यक्ष विनय तेंडूलकर, दाभाळ किर्लपालचे सरपंच दिपक पावसकर, कुळे पोलीस स्थानकाचे माजी निरीक्षक मनोज म्हार्दोळकर, राज्यातील नामवंत उद्योजक, साकोर्डा पंचायतीचे सरपंच, धारबांदोडा सरपंच व पंचसदस्य आदी मान्यवरांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

देवस्थान समितीने दर्शनासाठी जाणाऱया भक्तांची चोख व्यवस्था केली होती. दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनच्या जीप गाडय़ा भाविकांना ने आण करण्यासाठी सकाळपासून कार्यरत होत्या. देव दर्शनासाठी येणाऱया भक्तांसाठी फुले, अगरबत्ती, केळी, व देवसाहित्याची विक्री करणाऱया विक्रेत्यांची दुकाने मंदिराच्या अवती भोवती सर्वत्र थाटल्याने भाविकांची चांगली सोय झाली.

विविध सणासुदीनिमित्त थाटणाऱया खेळण्यांची दुकाने, भांडय़ांची दुकाने, मुलांना आकर्षित करण्यासाठी क्रीडा व मनोरंजनाची दुकानदारांची फेरी दिसत होती.  रात्री 10 वा. मनोरंजनाच्या कार्यक्रमात कोल्हापूर येथील ‘ऑर्केस्ट्रा ललकार’  व  त्यानंतर ‘उलटी नाती रक्ताची’ या नाटय़प्रयोगाचे सादरीकरण झाले. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थान समितीने कंबर कसली होती. सुमारे दहा हजार भाविकांनी श्रीच्या दर्शनाचा लाभ घेतला. दूधसागर देवतांचा जत्रौत्सव उत्साहात संपन्न झाला.

Related posts: