|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुर्टी येथील श्री कृष्ण नूतन मूर्तीचा वर्धापन दिन साजरा

कुर्टी येथील श्री कृष्ण नूतन मूर्तीचा वर्धापन दिन साजरा 

वार्ताहर/ म्हार्दोळ

केळबाय, कुर्टी फोंडा येथील श्री कृष्ण देवालयाचा श्री कृष्ण नूतन मूर्ती प्रतिष्ठा प्रथम वर्धापन महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा झाला.

सकाळपासून देवता प्रार्थना, संकल्प पूर्वक गणेश पूजा, स्वस्तिवाचन, देवनांदि, आचार्यवरण, ‘सगृहमख संप्रोक्षण विधी’ सहीत श्रीकृष्ण मंत्र जप होम, धार्मिक विधी,  पूर्णाहुती सहित धार्मिक विधी, तुलसी समर्पणाचा कार्यक्रम, महाआरती, महानैवेद्य व महाप्रसाद झाला. हजारो भाविकांनी तिर्थप्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. नंतर फळांची पावणी, आरत्या व तीर्थप्रसाद झाला. नतंर मोरुलो लोकनृत्य सादर करण्यात आले व रात्री सेल्फी कोंकणी नाटय़प्रयोगाने उत्साहाची सांगता झाली. मोठय़ा संख्येने गावातील नागरिकांनी व श्रीकृष्ण भक्तांनी तिर्थप्रसादाचा लाभ घेवून कार्यक्रमाची शोभा वाढवीली.

Related posts: