|Sunday, February 23, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘जॉली एलएलबी 2’ ठरला सर्वाधिकमाई करणारा जगातील दुसरा सिनेमा

‘जॉली एलएलबी 2’ ठरला सर्वाधिकमाई करणारा जगातील दुसरा सिनेमा 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी 2’या चित्रपटाने आता 100 कोटींची कमाई करत आणखी एक टप्पा पार केला आहे. 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केलेल्या या सिनेमाने आता आजून एक रेकॉर्ड बनवला आहे. 2017मध्ये जगभरात सर्वाधिक कमाई करणारा ‘जॉली एलएलबी 2’ हा दुसरा सिनेमा ठरला आहे.

आतापर्यंत या सिनेमाने जगभराची कमाई मिळून 157 कोटींची कमाई केली आहे. असे असले तरी ‘रईस’च्या एकूण कमाईपक्षा ही कमाई फार लांब आहे. ‘रईस’ने जगभरात 281.33 कोटींची कमाई केली होती. जॉलीच्या खालोखल 2017 मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱया सिनेमात ‘काबिल’चा नंबर लागतो.

Related posts: