|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राष्ट्रवादी विरोधकांना पुरून उरली

राष्ट्रवादी विरोधकांना पुरून उरली 

सातारा :

जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता राष्ट्रवादीने खेचून आणली आहे. अनेक आघाडय़ा राष्ट्रवादी विरोधात होत्या. परंतु सर्वांना पुरुन उरली राष्ट्रवादी. जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीमध्ये आपल्याच सदस्यांच्या बाजूने रहा. पक्षाच्या वरिष्ठांचे आदेश पाळा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व बैठकांना हजेरी लावा, असा कानमंत्र जिल्हा प्रभारी शशिकांत शिंदे व बाळासाहेब पाटील यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिला.

राष्ट्रवादी भवनात आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळय़ाप्रसंगी ते बो

लत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, आ. दीपक चव्हाण, बाळासाहेब भिलारे, दादाराजे खर्डेकर उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले, राज्यात आणि देशात सत्ता नसताना या निवडणुकीत वेगवेगळे निकाल लागत होते. अपवाद मात्र सातारा जिल्हा परिषद ठरली. येथे पालिका निवडणुकीमध्येही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिह्यात अजितदादांचे विचार जिंवत राहिले. अनेक लोक पक्षाबाहेर गेले. राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमुळे सत्ता पुन्हा जिल्हा परिषदेच्या ताब्यात राहिली. पूर्वीपेक्षा आता 64 संख्या असताना 39 सदस्य निवडून आले आणि  एका अपक्षाने पाठींबा दिला आहे. एकहाती सत्ता मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. 11 पैकी दहा पंचायत समित्या आपल्या ताब्यात आल्या आहेत. 11 वीही बाळासाहेब पाटील आपलीच करणार हा विश्वास आहे, असे त्यांनी सांगत, वसंतराव मानकुमरे हे जाईंट किलर ठरत आले आहेत, असे सांगत, सभागृहात केवळ राष्ट्रवादीच्या सदस्यांना पाठींबा द्या, असाही कानमंत्र त्यांनी दिला.

हिशोब देवू नका…
पूर्वीच्या पदाचे राजीनामे द्या

शेवटी सुनील माने यांनी सदस्यांना निवडणूक आयोगाला पक्षाचे हिशोब देवू नका, वैयक्तिक हिशोब द्या, दोन दिवसात पक्षाचे राष्ट्रवादीकडून  हिशोब देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कोणत्याही सदस्याला जातीच्या दाखल्याची अडचण आल्यास पक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

विश्वजितराजेंची शिवेंद्रराजेंकडून विचारपुस

सर्व ठिकांणी सध्या सदस्यांचे सत्कार सोहळे सुरु होते. त्यामुळे एकेक सदस्य पुढे गेल्यानंतर नारळ आणि राष्ट्रवादीचा गमजा घेवून परत आसनस्थ होत होते. याच दरम्यान, राजकुमार पाटील यांनी विश्वजितराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव पुकारले असता ते पुढे आले व सत्कार स्वीकारल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे व सत्यजितसिंह पाटणकरांनी त्यांची विचारपूस केली.

 

Related posts: