|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कवठेमहांकाळ डेपोच्या एस.टी. चालकाला मारहाणीच्या निषेधार्थ दोन तास एस.टी. बंद

कवठेमहांकाळ डेपोच्या एस.टी. चालकाला मारहाणीच्या निषेधार्थ दोन तास एस.टी. बंद 

प्रतिनिधी /कवठेमहांकाळ :

कवठेमहांकाळ एस.टी. डेपोच्या चालकाला मारहाण करणाऱया दोन जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून मारहाणीच्या निषेधार्थ एस.टी.ची चालक वाहकांनी तब्बल दोन तास कामकाज बंद ठेवले. दोन तासांमध्ये प्रवाशांचे मात्र आतोनात हाल झाले.

कवठेमहांकाळ एस.टी. डेपोची एम.एच. 12 ईएफ 6289 ही एस.टी. कवठेमहांकाळ हून तासगावकडे जात असताना महांकाली साखर कारखान्याजवळ मुलींना पाहून गाडी का थांबवलीस असे म्हणत दोन तरुणांनी एस.टी. चे चालक डी.एस. पाटील (रा. बोरगांव) यांच्या दिशेने दगड मारला आणि हा दगड चालकांच्या वर्मी लागल्याने दुखापत झाली. ही घटना जवळच असलेल्या एस.टी. डेपोत समजली आणि लगेचच या डेपोचे चालक वाहक आणि कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आणि क्षणाधार्थ एस.टी. चाके जागच्या जागी थांबली.

एस.टी. चालकाला मारहाण करणाऱया तरुणांवर कारवाई करावी, त्यांना अटक व्हावी या मागणीसाठी एस.टी. कर्मचाऱयांनी डेपो समोर ठिय्या मांडला व काम बंद आंदोलन सुरु केले. काही वेळांनी पोलीस तेथे आले त्यांनी घटनेची माहिती समजून घेतली व चालकाला संबंधीत तरुणांविरुद्ध तक्रार करण्यास सांगितले त्यानुसार एस.टी. चालक, डी.एस. पाटील यांनी फिर्याद दिल्याने विकास कानीफ पवार (रा. कवठेमहांकाळ) व अरविंद बाबासाहेब पवार (रा. कडलास) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related posts: