|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » ई कंपन्यांच्या व्यवहारांवर नजर

ई कंपन्यांच्या व्यवहारांवर नजर 

विक्रेत्यांना देयक देण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारीची दखल  

वृत्तसंस्था / नवी दिल्ली 

ई-व्यापार कंपन्यांकडून विक्रेत्यांना देयक देण्यासाठी विलंब होत असल्याने सरकार त्याचा तपास करणार आहे. हा विषय ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडे उपस्थित करण्यात येणार आहे असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले. ई-व्यापार कंपन्या देयक देण्यासाठी विलंब करत आहेत, अशा अनेक तक्रारी सरकारकडे करण्यात आल्या आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्रेत्यांनी देयक न मिळाल्याची तक्रार केली होती. हा विषय ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडे उपस्थित करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक व्यवहारांचा कोणतीही गडबड नाही अथवा नियमांचे उल्लंघन होत आहे, याची पाहणी करणे गरजेचे आहे. या समस्येचे अनेक पैलू असू शकतात असे सीतारामन यांनी म्हटले.

या प्रकरणी केवळ वाणिज्य मंत्रालय कोणतीही कारवाई करू शकत नाही. दुसऱया मंत्रालय आणि विभागांची आवश्यकता गरजेचे आहे. बाजारात सध्या काही समस्या आहेत. मात्र याचा एकत्र येत विचार करण्यात येईल आणि त्याची सोडवणूक करण्यात येईल असे त्यांनी म्हटले.

सरकारी व्यवहारात स्पष्टता

निष्पक्ष स्पर्धेला चालना देण्यासाठी सरकारी खरेदीमध्ये पारदर्शकता आली पाहिजे. देशाच्या जीडीपीमध्ये सरकारी खरेदीची हिस्सेदारी साधारण 30 टक्के आहे. संरक्षण, रेल्वे आणि दूरसंचार क्षेत्रात अधिक प्रमाणात खरेदी होती. स्पर्धात्मक आयोग सरकारी व्यवहारांवर नजर ठेऊन असतो असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांत सरकारच्या खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. मात्र त्यावर नियंत्रण कमी प्रमाणात दिसत आहे.