|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारकर उन्हाने झाले बेजार

सातारकर उन्हाने झाले बेजार 

प्रतिनिधी/ सातारा

मार्च महिना सुरु झाला नाही रे नाही तोच तापमानातही कमालीचा बदल झाला आहे. साताऱयाचे तापमान 37 अंश सेल्सिअस झाल्याने उन्हाने साताराकर उन्हात होळपळून निघत आहेत. सकाळी 11 वाजल्यापासूनच कडक उन्ह पडु लागल्याने शाळा, महाविद्यालयाला विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होताय. त्यामुळे सावली मिळवण्यासाठी जो तो धडपडताना दिसत आहे.

सातारा तसा थंड हवेचे ठिकाण म्हणुन ओळखले जाते. त्यामुळे बाकीच्या जिल्ह्य़ापेक्षा साताऱयात कमी उन्ह व जास्त पाऊस असते असे समजले जाते. परंतु यंदा उन्हाच्या कडाका जरा जास्त असल्याचे दिसून येत आहे. सध्या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. सकाळी 11 वाजल्यापासुनच उन्हाचा पारा वाढायला सुरुवात होते तर भरदुपारी रस्त्यावर येताच घामाच्या धारा सुरु होतात. सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत कडक उन्ह जाणवते. या कालावधीत रस्तेही ओस पडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच कडक उन्हात गारवा मिळावा यासाठी  सरबत, ज्युसच्या गाडय़ांवर गर्दी होताना दिसते. केवळ थंड पेयांचीच बाजारात गर्दी नसून स्कार्प, स्टोल, सन कोट, हेलमेट, हॅण्डगोज, सन क्रिम, गॉगल अशा वस्तूसाठीही लोकांनी दुकानामध्ये गर्दी केली आहे. तर काही दुकांनानी समर ऑफर म्हणुन वेगवेगळया सुविधा लोकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत.

तर तरुण तरुणी यामध्येही फॅशन बघत आहेत. त्यामुळे रुमाल हेलमेट खरेदी करतानाही त्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत का मग वेगळया डिझाईनचा आहे का याची चौकशी ते करत आहेत. एकंदर कडक उन्हाला सुरुवात झाली आहे.

Related posts: