|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गंजलेल्या चमच्यांमुळे आमची तिकीट कापली

गंजलेल्या चमच्यांमुळे आमची तिकीट कापली 

सातारा

आरक्षण पडले होते. नेत्यांचा विश्वास होता. मात्र, नेत्यांजवळच्या गंजलेल्या चमच्यांमुळेच आमची तिकीट कापली गेली. नाही तर आम्ही पुन्हा भरघोस मतांनी निवडून आलो असतो, अशी खदखद नंदा भिसे यांनी व्यक्त केली. त्यांच्यासह इतर सदस्यांनीही निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत भावना व्यक्त केल्या, तर निवडून आलेल्या सदस्यांनीही तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे, असे आश्वासन दिले गेले. यामुळे पंचायत समितीची शेवटची सभा अधिकाऱयांसाठी खुशी तर सदस्यांसाठी गम अशीच ठरली.

पंचायत समितीच्या मासिक सभेत नेहमी अधिकाऱयांना फैलावर घेणारे सदस्य मात्र, भावूक झाले. काहींच्या डोळय़ाच्या पापण्या ओलावल्या. तर काहींनी थेट टीप्पणीच केली. सभापती कविता चव्हाण यांनी आमदार शिवेंद्रराजे यांनी तालुक्यात यश मिळवल्यामुळे त्यांच्यासह राष्ट्रवादी पार्टीचे अभिनंदन केले. मात्र, अजूनही तालुक्यात राष्ट्रवादीच्या सीटा लागल्या असत्या, काहींनी बंडखोरी केल्यामुळे लागल्या नाहीत, संगीता कणसे या निवडून आल्या असत्या, असा विश्वास व्यक्त केला. धर्मराज घोरपडे यांनीही प्रवीण धस्के हे अभ्यासू असल्याने ते दोन्हीपैकी एका सभागृहात परत येतील अशी आशा होती. मात्र, तसे झाले नाही. त्यांचे प्रयत्न कमी पडले असतील. त्यांचे आणि माझे शाब्दीक खटके उडाले होते. ते लोकांच्या समस्येसाठीच होते. दोघांचा कसलाही वाद नव्हता. इकडे सूर्यकांत पडवळ हेही विजयी झाले असते, अशा निवडणुकीतील आठवणी जाग्या केल्या. नंदा भिसे आक्रमक झाल्या. मी केवळ गणात काम नाही तर गटातील सर्व वाडय़ावस्त्यावर काम केले होते. आरक्षण पडल्याने लोकांकडून माझ्या उमेदवारीचीच मागणी होती. मात्र, नेत्यांच्या जवळच्या लोखंडी गंजलेल्या चमच्यांना पैसेवाला उमेदवार हवा होता. लोकांची कामे करणारा नको होता. त्यामुळेच लादलेल्या उमेदवाराचा पराभव झाला. माझे तिकीट कापले तरीही मी गप्प बसणार नाही. मी चळवळीतील कार्यकर्ती आहे. पुन्हा सभागृहात येणारच, असे निक्षून सांगितले. प्रवीण धस्के, सूर्यकांत पडवळ, विजय काळे यांच्यासह कधीही सभागृहात न बोलणाऱया सदस्यांनीही अधिकाऱयांचे कौतुक केले.

गटविकास अधिकाऱयांचे कौतुक

महिला सदस्या अक्षरशः भावूक झाल्या. त्यांनी सर्वांजवळ पैसा आहे वेळ आहे. परंतु कुलुमनालीला जायला मिळत नाही, हे घाडगेसाहेबांमुळेच साध्य झाल्याचे सांगत कौतुकांचा वर्षाव त्यांच्यावर केला. मात्र, सभेच्या सुरुवातीला शिल्लक राहिलेला सेस फंडाच्या सव्वा चार लाखाचा निधी आम्हालाच मिळावा, अशी मागणी केली. यावरुन काही काळ वाद रंगला.

Related posts: