|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्रारुप आराखडय़ावर सोमवारी निर्णय

प्रारुप आराखडय़ावर सोमवारी निर्णय 

प्रतिनिधी / सातारा

पश्चिम महाराष्ट्रातील जिह्यांच्या नियोजन मंडळाच्या प्रारुप आराखडय़ावर अंतिम निर्णय घेण्याच्या अनुषंगाने पुण्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उशिरा घेण्यात आली. सकाळची बैठक संध्याकाळी घेतल्याने साताऱयाच्या दोन आमदारांनी केवळ पत्र देवून नाराजी व्यक्त करत परत फिरले. सहपालकमंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्रारुप आराखडा सादर केला. त्या आराखडय़ामध्ये किती वाढीव निधी मिळाला याची माहिती मात्र सोमवारी सायंकाळी मंत्रालयातून मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सातारा जिह्याचा नियोजन मंडळाच्या सभेत मूळ प्रारुप विकास आराखडा 223 कोटी रुपयांचा तर आणखी वाढीव 204 कोटींची मागणी केली आहे. या आराखडय़ांवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्राची बैठक सकाळी आयोजित केली होती. या बैठकीसाठी जिह्यातील प्रमुख अधिकाऱयांनी हजेरी लावली होती. यामध्ये जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजनचे अधिकारी या बैठकीला अर्थमंत्री हे दिलेल्या वेळेत न आल्याने साताऱयाचे गेलेले आमदार शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील या दोन्ही आमदारांनी प्रखर नाराजी व्यक्त करत पत्र देवून परत फिरले. त्यांनी दिलेल्या पत्रांमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी जिल्हा नियोजन मंडळाचा निधी वापरण्यात येवू नये. राज्य शासनाकडून त्यासाठी वेगळा निधी देण्यात, केंद्रपुरस्कृत योजनांवर निधी खर्च केल्यानंतर त्यामध्ये आणखी विकासकामे होतात, अशी मागणी केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही जलयुक्त शिवार या योजनेसाठी वेगळा निधी राज्य शासनाकडूनच प्रत्येक विभागाला वितरित करण्याचे जाहीर केले आहे. तसेच कुशल युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्याच्या अनुषंगानेही त्यांनी नियोजन मांडले आहे. दरम्यान, या प्रारुप विकास आराखडय़ाबाबत नक्की किती निधी दिला गेला याची माहिती सोमवारी सांयकाळी सांगण्यात येणार असल्याचे सहसचिवांकडून सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हावासियांच्या नजरा त्याकडे लागून राहिल्या आहेत.

Related posts: