|Saturday, October 19, 2019
You are here: Home » विविधा » 500 रुपये द्या अन् जेलची ‘हवा’ खा !

500 रुपये द्या अन् जेलची ‘हवा’ खा ! 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोणताही गुन्हा केला की न्यायालयाकडून संबंधित गुन्हेगाराची तुरुंगात रवानगी करण्यात येते. सर्वसाधारणपणे फक्त गुन्हा सिद्ध झालेल्या व्यक्तीलाच तुरुंगात जाण्याची शिक्षा मिळते. मात्र, आता फक्त 500 रुपये देऊन संपूर्ण एका दिवसासाठी जेलची ‘हवा’ खायला मिळणार आहे.

सध्या तेलंगणा राज्यातील जेल टुरिझमच्या धर्तीवर ही योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही अशाप्रकारची योजना सुरु करण्याचा विचार आहे. या योजनेंतर्गत पर्यटकांनाही जेलमध्ये जाता येणार आहे. या नव्या योजनेसाठी राज्यातील कारागृह प्रशासनानेही हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना पैसे भरुन ‘जेलवारी’ करता येणार आहे. राज्यातील रत्नागिरी, ठाणे आणि सावंतवाडी या कारागृहात सर्वसामान्यांना प्रवेश मिळणार आहे. या योजनेंतर्गत कारागृहातील एखाद्या कैद्याला ज्याप्रकारे सुविधा दिल्या जातात, अशाच प्रकारच्या सुविधा संबंधित व्यक्तीला मिळणार आहे.

याबाबत राज्याचे कारागृह महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांनी आदेशही जारी केले आहेत. त्यामुळे आता फक्त 500 रुपये भरुन संपूर्ण एक दिवसासाठी जेलमध्ये मुक्काम करता येणार आहे.