|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अध्यक्षपदासाठी दादांनी पंबर कसली

अध्यक्षपदासाठी दादांनी पंबर कसली 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी पक्षांतर्गत चुरस सुरू झाली असून पाटणचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी यात धडाडी घेतली आहे. पाटण विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार आहेत. एकीकडे राज्यातील-केंद्रातील सत्ता वापरली जात असताना सत्यजितसिंहांनी आपल्या हिकमतीवर पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असाताना पक्षानेही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देऊन तसाच परतावा द्यावा, या मागणीने उचल खाल्ली आहे.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत यंदा पाटण, मेढा, कराड व पाटण या तीन तालुक्यांत चढाओढ सुरू आहे. राष्ट्रवादीने बालेकिल्ला सांभाळताना पदांचा वापर हा त्या-त्या तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला उभारी देण्यासाठी केला आहे. सध्या राष्ट्रवादीचा राज्यातील एकमेव लाल दिवा फलटणांत आहे. जावलीत पुर्णतः पक्षाची सत्ता आहे. कराड तालुक्यात राष्ट्रवादीची उंडाळकर यांच्या इतकेच संख्याबळ असले तरी उत्तरेत बाळासाहेब पाटील यांची स्थिती भक्कम आहे.

पाटण तालुक्याने राष्ट्रवादीला सातत्यानेच भरभरून दिले आहे. सध्या तालुक्यात सेनेचा आमदार असतानाही सत्यजितसिंह पाटणकरांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण तालुक्यातील कार्यकर्ते एकदिलाने लढले व एकहाती सत्ता आली.

यापुर्वी विक्रमसिंह पाटणकरांच्या निवडणूकीत पक्षाध्यक्ष शरद पवारांनी ‘तुम्ही आमदार करा, मी लाल दिवा देतो’ मात्र काही राज्यस्तरीय गाणितं सांभाळताना साहेबांना हा शब्द पुर्ण करता आला नव्हता. आता वेळ कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून पवारसाहेबांना शब्द आहे कि, ‘साहेब आता तुम्हा लाल दिवा द्या, आम्हा  सत्यजितदादांना आमदार करतो.’

अध्यक्षपदाबाबत असा काही रेटा लागल्याने जिल्हय़ाच्या राजकारणात सत्यजितसिंहांकडे राजकिय जाणकारांचे डोळे लागले आहेत.

Related posts: