|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » अमेरिकेत भारतीयावर पुन्हा हल्ला, हल्लेखोराकडून गोळीबार

अमेरिकेत भारतीयावर पुन्हा हल्ला, हल्लेखोराकडून गोळीबार 

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

तुमच्या देशात आता परत जा, अशी धमकी देत अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील भारतीय शीख तरुणावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यानंतर अमेरिकेत राहणाऱया भारतीयांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

भारतीय तरुण हा वॉशिंग्टन येथील कँटमध्ये वास्तव्यास आहे. हा तरुण आपल्या घराबाहेर गाडीचे काम करत होता. नेमक्या याचदरम्यान अमेरिकन हल्लेखोर तरुणाने त्याचा पाठलाग केला आणि त्याला तुमच्या देशात परत जा अशी धमकी दिली. इतकेच नव्हे तर या हल्लेखोराने त्या तरुणावर त्याच्याकडील बंदुकीतून त्याच्यावर गोळी झाडली. या गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाला. या हल्ल्यात भारतीय तरुण जखमी झाला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.