|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » ठाणे महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे बिनविरोध

ठाणे महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे बिनविरोध 

ऑनलाईन टीम / ठाणे :

ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या बिनविरोधी निवडीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचे आभार मानले. शिंदे यांच्या निवडीमुळे ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर आणि उपमहापौरपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवार न देत माघार घेतल्याने मी विरोधकांचे आभार मानतो. तसेच ठाण्यात ज्या प्रकारे शिवसेनेला यश मिळाले आहे. या यशाबद्दल माझ्या शिवसैनिकांना मानाचा मुजरा. गेली 25 वर्षे ठाणेकरांनी शिवसेनेला जी साथ दिली, याबद्दल त्यांनी ठाणेकरांचेही आभार मानले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना मुंबई महापौरपदाबाबत विचारले असता ते म्हणाले, मुंबईचा महापौर कोण असेल यासाठी अजून दोन दिवस बाकी आहेत. आता मी फक्त भावना व्यक्त करण्यासाठी आलो आहे, असे म्हणत यावर बोलण्यास टाळले.