|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » टेंभुच्या पाणीपट्टी वसुलीत कोटय़ावधींचा घोटाळा

टेंभुच्या पाणीपट्टी वसुलीत कोटय़ावधींचा घोटाळा 

प्रतिनिधी/ आटपाडी

आटपाडी तलावातील टेंभुच्या पाण्याचे करोडो रूपये वसुल करून सिध्दनाथ पाणी वापर संस्थेने मोठा भ्रष्टाचार केला आहे. कोटय़ावधी रूपये शेतकऱयांकडुन वसुल केले असताना शासनाकडे तीन वर्षात फक्त 7 लाख 21हजार 705 इतकेच रूपये भरले आहेत. शेतकऱयांकडून वसुल केलेली पाणीपट्टी आणि प्रत्यक्षात जमा रक्कमेत मोठा घोटाळा आहे. या प्रकरणी पाणी वापर संस्थेसह पाटबंधारे अधिकाऱयावंर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

आटपाडी पाटबंधारे कार्यालयात शेतकऱयांसह अधिकाऱयांना धारेवर धरून गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तलावातील पाण्याबाबत दिशाभुल सुरू असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला. आटपाडी तलावात टेंभुच्या आलेले पाणी शेतकऱयांना देताना श्री.सिध्दनाथ पाणी वापर संस्थेने मोठय़ा प्रमाणात वसुली केली आहे. पाण्यासाठी प्रत्यक्षात करोडो रूपये वसुल केले असताना शासनाकडे म्हणजे पाटबंधारे विभागाकडे अत्यंत कमी रक्कम त्यांनी भरली आहे.

टेंभुचे पाणी 2013पासून आटपाडी तलावात आले. 2015 ते 2017 या कालावधीत या पाणी वापर संस्थेने 7 लाख 21हजार 705रूपये भरले आहेत. शासनाने पैसे भरून मोफत सोडलेल्या पाण्याच्या पैशाची वसुलीही या पाणी वापर संस्थेने केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. तलावात मिटर बसवले आहेत. पण, त्याचे दरपत्रकच अद्याप दिलेले नाही. मनमानी पध्दतीने शेतकऱयांना 70 ते 80हजार रूपयांच्या पावत्या दिल्या आहेत. शिवाय पाटबंधारेकडून दिलेल्या अनेक पावत्या चुकीच्या व बोगस असल्याचा आरोप करत पाणी वापर संस्थेसह आटपाडी पाटबंधारे विभागही या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला.

पाटबंधारे विभाग, पाणी वापर संस्थेचे ऐकुन महावितरणने कोणत्याही शेतकऱयांचे वीज कनेक्शन तोडु नये. अन्यथा आम्ही त्यांना योग्य भाषेत उत्तर देवु, असा इशाराही पडळकर यांनी दिला. आटपाडी तलावातील या पाणी वापर संस्था आणि अधिकाऱयांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी आपण बुधवारी मुख्यमंत्र्यांना भेटुन तक्रार करणार आहे. पाणीप्रश्नावरून तालुक्यातील सर्वच बेकायदेशीर कामे करणाऱया संस्था रद्दबातल कराव्यात, अशी आपली मागणी असून टेंभुच्या पाण्याबाबतची संगनमताने सुरू असणारी लुट थांबविण्यासाठी आपण तीव्र लढा देणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

टेंभुचे पाणी घेणाऱया शेतकऱयांना नियमबाहय़ पध्दतीने पाणीपट्टी आकारणी करून लुट केली आहे. तलावाखालील पाण्याचा हक्क असणाऱया पाणी वापर संस्थेला आता तलावाच्या आतील उचल परवान्यांच्या वसुलीसाठी पाटबंधारे अधिकाऱयांनीच प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे एका-एका शेतकऱयाला लाखो रूपयांची पाणीपट्टीची बीले माथी मारण्यात आली आहेत. अशा शेतकऱयांनी आपली शेती विकुन पाणीपट्टी भरायची काय? असा उव्दिग्न सवालही पडळकर यांच्यासह शेतकऱयांनी केला.

याप्रसंगी हरिशेठ गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, उत्तम पाटील, शिवराम मासाळ, यशवंत मेटकरी, दत्तात्रय नांगरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पाटबंधारे विभागाने शेतकऱयांना बजावलेल्या पाणीपट्टी आकारणीच्या अनेक आक्षेपार्ह नोटीसा पडळकर व शेतकऱयांनी सादर केल्या.

मुख्यमंत्र्यांना भेटणार

आटपाडी तलावातील टेंभुच्या पाण्याच्या पाणीपट्टीच्या घोटाळय़ाबाबत आपण बुधवारी मुख्यमंत्र्यांना भेटुन लेखी तक्रार करणार आहे. टेंभुच्या पाण्याचा गैरवापर करून आर्थिक कमाई करून घरे भरण्याचा उद्योग आटपाडीमध्ये सुरू असून तो कदापी सहन केला जाणार नसून पाणी वापर संस्थेसह पाटबंधारे अधिकाऱयांवर फौजदारी कारवाईसाठी आपण

Related posts: