|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘मुलींचा जीव आणि मुलांचा जीव वेगळा असतो काय?

‘मुलींचा जीव आणि मुलांचा जीव वेगळा असतो काय? 

संजय गायकवाड / सांगली

महाराष्ट्रातील कोणत्या तरी ग्रामीण भागामध्ये साधारणपणे 1999पुर्वी घडलेली सत्य कथा, शोभा आणि वसंत असे संयुक्त कुटुंबातील दोघे सदस्य, दोघेही शेती करणारे, वसंत सातवी पास तर शोभा निरक्षर,  वयाच्या 18व्या वर्षी तिला पहिली मुलगी झाली, दोघांनाही कुटुंबनियोजनाची माहिती आहे. पण शेवटी वशांला दिवा म्हणून मुलगा हवाच, या अट्टाहासातून शोभाला एकापाठोपाठ सहा मुली झाल्या, शेवटच्या गरोदरपणाच्या वेळी कुटंबाच्या दबावाला बळी पडून शोभाला गर्भलिंग परीक्षणास तयार होणे भाग पाडले, परंतु परीक्षणापुर्वी तिने नवऱयाला सांगितले,तुमच्या आग्रहामुळे मी परीक्षण करून घेते, परंतु मी माझ्या बाळाचा गर्भपात करणार नाही, जरी तो मुलीचा गर्भ असला तरी, मुलीचा जीव आणि मुलाचा जीव वेगळा असतो काय? निरक्षर असणाऱया शोभाने गर्भपात करवून घेण्यास ठाम नकार देऊन केवळ  तिच्या पतीलाच नव्हे तर वंशाचा दिवा हवा म्हणून स्वतःच्या पत्नीचा जीव घालणाऱया महाराष्ट्रातील स्वतःला सुशिक्षीत आणि शिकल्या सवरलेल्या  हजारो नव्हे तर लाखो लोकांच्या डोळयात झणझणीत अंजनच घातले.  स्त्राr भ्रुण हत्या आणि त्याअनुषंगाने महाराष्ट्रात या विषयावर अभ्यास करणाऱया  डॉ.अंजली राडकर यांनी 1999साली पीएचडीसाठी सादर केलेल्या प्रबंधातील उतारा राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काही वर्षापुर्वी  प्रसिध्द केला होता. सध्या सांगली जिल्हयाच्या बाबतीत हा उतारा  तंतोतंत खरा ठरतो.

बोल्ड करणे……………सधन सांगली जिल्हयाची मान खाली.

‘सांगली ’ या तीन अक्षरातच सर्व काही आहे. सांगलीला काय नाही, राजकारणापासून ते क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, साखर कारखानदारी, व्यापार अशा सर्व क्षेत्रात हा जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. सांगली नावाप्रमाणेच चांगली आहे. एका बाजूला कृष्णा, वारणा नद्याच्या अंगा खांदावर खेळणारा सधन भाग तर दुसरीकडे पाचवीला पुजलेला दुष्काळी भाग तरीही कधी हार न मानणारा हा जिल्हा, या जिल्हयाने अनेक क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली. नाव कमाविले. त्यामुळे  या जिल्हयाचा राज्यातीलच नव्हे तर  देशातील अनेक भागांना नेहमीच हेवा वाटत आला आहे. पण दुसरीकडे या जिल्हयात आजही स्त्राr भ्रुण होतायेत ही दुःखाची आणि  जिल्हयाची मान शरमेने खाली घालायला लावणारी बाब आहे.

समाजही तेवढाच जबाबदार

मिरजेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱया म्हैसाळ या गावामध्ये तब्बल 17 अर्भकांचे अवशेष सापडल्याची घटना उघडकीस आली असून मागील काही वर्षापासून येथे राजरोसपणे हा प्रकार सुरू होता. आता तो उघड झाला. यात बेकायदेशीरपणे गर्भपात करणारा तो डॉक्टर जेवढा कारणीभूत आहे. तेवढेच त्या महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडणारेही लोकही तेवढचे जबाबदार आहेत.

शासनाकडून मोठया प्रमाणात प्रबोधन

एका बाजूला राज्य व केंद्र शासन स्त्राr भ्रुण हत्या रोखण्याबाबत कोटयावधी रूपये खर्च करून प्रबोधन आणि जनजागृती करत आहे. त्याचा  चांगला परिणामही दिसत  आहे. तर दुसरीकडे समाजात विशेषतः स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे अनेक लोक आजही  गर्भपातासारख्या जीवघेण्या प्रकारातून स्वतःच्या पत्नीचा जीव  धोक्यात घालताना दिसत आहेत.

सर्व क्षेत्रात मुलींची मोठी झेप

आज मुली कशात कमी आहेत. संगणकापासून ते अवकाशापर्यंत ,  राजकारणापासून ते क्रीडापर्यंत अशी सर्व क्षेत्रे मुलींनी व्यापली आहेत. अगदी रेल्वे  आणि मेट्रो चालविण्यासपासून ते विमानांचे पायलट आणि देशाच्या संरक्षणापासून ते आयटीपर्यंत सर्व क्षेत्रात मुली अतिशय चमकदार आणि दमदारपणे कामगिरी करत असताना पुन्हा वंशाचा दिवा पाहिजे म्हणून गर्भपात करण्याचे प्रकार  सांगली जिल्हयात आजही प्रकार सुरू आहेत. आणि शासनाने त्यावर बंदी घातली असतानाही आणि  गंभीर गुन्हा व कडक शिक्षा असतानाही ते करवून घेणारी कुटुंबेही आहेत. ही दुदैवाची गोष्ट आहे.  एका अगर दोन मुलीवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणारे अनेक पालक  असून , मुलगा मुलगी असा भेदभाव न मानता  मुलींना मुलाप्रमाणेच  किंबहुना मुलांपेक्षाही चांगले करीअर घडवून त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करणारे पालक एका बाजूला असताना दुसरीकडे स्त्राr भ्रुण हत्या आणि जन्माला यायच्या अगोदच त्यांचे जीव घेणारेही पालकही याच जिल्हयात आहेत. हा केवढा मोठा विरोधाभास आहे.

Related posts: