|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आजपासून दहावीची परीक्षा

आजपासून दहावीची परीक्षा 

सोलापूर/ प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेबुवारी-मार्च 2017 मध्ये घेण्यात येणाऱया दहावीच्या लेखी परीक्षेला आज (मंगळवार) पासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी लागणाऱया सर्व यंत्रणा देखील सज्ज झाले आहेत.

7 फेब्रुवारी ते 1 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी सोलापूर जिह्यातून एकूण 69 हजार 110 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तसेच 12 वी ची देखील परीक्षा सुरू असल्यामुळे जिह्यात सर्वत्र परीक्षेचे वातावरण तयार झाले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी लागणाऱया सर्व परीक्षा केंद्र देखील सज्ज  आहेत. सोलापूर जिह्यात एकूण 156 परीक्षेचे मुख्य केंद्र असून, यामध्ये ग्रामीण भागात 110 तर शहरी भागात 46 परीक्षा केंद्र आहेत. तसेच 22 उपकेंद्रे ठेवण्यात आली आहेत.

तसेच परीक्षेच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी 178 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. यात ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रासाठी 122 तर शहरी भागातील परीक्षा केंद्रावर 56 भरारी पथक असणार आहेत. परीक्षेच्या ठिकाणी गैरप्रकार करताना आढळल्यास संबंधीत विद्यार्थ्यावर लगेच कारवाई करण्यात येणार आहे. पेपर पुटीबाबतही यंदाच्या वर्षी काळजी घेण्यात आली असून, उशीरा येणाऱया विद्यार्थ्यांवर विशेष करुन लक्ष दिले जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या आसपासच्या परीसरात परीक्षेच्या वेळेत झेरॉक्स दुकान बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

परीक्षार्थीचे पालकही आपल्या पाल्याचा अभ्यास घेण्यामध्ये गर्क झाले असल्यामुळे अनेक ठिकाणी शांतता पाहायला मिळत आहे. त्यासोबत सिद्धेश्वर मंदिर, समाज कल्याण केंद्र, गंथालये आणि सार्वजनिक ठिकाणी मुले अभ्यासाला बसत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणेही विद्यार्थ्यांमुळे भरुन गेले आहे

Related posts: