|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » Top News » गर्भपात रॅकेटचा सूत्रधार बाबासाहेब खिद्रापुरेला अटक

गर्भपात रॅकेटचा सूत्रधार बाबासाहेब खिद्रापुरेला अटक 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱया सांगली जिह्यातील म्हैसाळ येथील गर्भपात रॅकेटचा प्रमुख सूत्रधार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेला मंगळवारी रात्री उशीरा बेळगाव येथून अटक करण्यात आली आहे.

सांगली पोलिसांची पाच तपास पथक संपूर्ण राज्यात खिद्रापुरेचा शोध घेत होती. अखेर त्याला बेळगावमधून अटक करण्यात आली. मणेराजुरी येथील प्रवीण जमदाडे या विवाहितेच्या मृत्यूनंतर रविवारी सांगली पोलिसांनी या अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश केला.बीएचएमएसची पदवी असलेल्या खिद्रापुरेने म्हैसाळमध्ये रूग्णलय सुरू केले होते. पण प्रत्यक्षात तो येथे अवैध गर्भपात करायचा.म्हैसाळच्या ओढय़ालगत गर्भपात करून दफन केलेले 19 भ्रूण पोलिसांना रविवारी सापडले.

Related posts: