|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » परवेझ रसूलचा जेके संघ सोडण्याचा विचार

परवेझ रसूलचा जेके संघ सोडण्याचा विचार 

वृत्तसंस्था / श्रीनगर

जम्मू-काश्मीरमधील क्रिकेटचा प्रशासकीय दर्जा खूपच खालावला असून त्यामध्ये सुधारणा झाली नाही, तर आपण इतर राज्यांकडून खेळण्याचा विचार करेन, असे वैयक्तिक मत जम्मू-काश्मीरचा राष्ट्रीय क्रिकेटपटू परवेज रसूलने व्यक्त केले आहे.

गेल्या तीन-चार वर्षांच्या कालावधीत जम्मू-काश्मीर संघाकडून खेळताना राज्यांच्या क्रिकेट प्रशासन कारभाराचा दर्जा खूपच खालावल्याचे जाणवले. पण राज्यातील नवोदित तरूण क्रिकेटपटूंच्या प्रोत्साहनामुळे आपण आजही या राज्यातून क्रिकेट खेळत आहे. राज्यातील क्रिकेटपटूंना पुरेशा सुविधा मिळत नसल्याची तक्रार त्याने केली आहे. सुमारे 300 कि.मी. काश्मीरच्या परिसरात केवळ दोनच खेळपट्टय़ा उपलब्ध आहेत त्यामुळे क्रिकेटपटूंना सातत्याने सराव करता येत नाही. राज्यातील क्रिकेट जिवंत राहिले पाहिजे पण त्याच्यावर विपरित परिणाम होवू नये याची काळजी जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट प्रशासनाने घ्यावी अशी मागणी परवेज रसूलने केली आहे.