|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वाल्मिकी आवास मध्ये चोरटयांची टोळी जेरबंद,सात गुन्हे उघडकीस

वाल्मिकी आवास मध्ये चोरटयांची टोळी जेरबंद,सात गुन्हे उघडकीस 

प्रतिनिधी/ सांगली

येथील जुना बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवास योजनेच्या घरकुलातील चोरटयांची टोळी जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले आहे. चोऱयासाठी लहान मुलांचा वापर होत असल्याचे उघडकीस आले असून तीन अल्पवयीनांसह पाच जणांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून शहरातील सात घरफोडया उघडकीस आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. चाकु,सुरे,कोयता,चोरीसाठी लागणारी घातक हत्यारे आणि तीन मोटरसायकल सह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, वाल्मिकी आवास योजनेच्या घरकुलात काही अल्पवयीन मुले चोऱया आणि घरफोडय़ा करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांना मिळाली. त्याचबरोबर या इमारतीमध्ये असणाऱया 1164 क्रमांकाच्या मोकळया निवासस्थानात या चोरटयांनी घरफोडीतील साहित्य, हत्यारे लपवली असल्याचीही माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे बाजीराव पाटील यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी सहा वाजताच 49 क्रमांकाच्या बिल्डींगमधील त्या निवासावर छापा टाकला. त्यामध्ये दोन लाखांचे साहित्य आणि हत्याचे हस्तगत करण्यात आली आहेत.

तर जावेद नुरमहंमद गवंडी वय 35 रा.गल्ली क्रमांक सहा, राजीव गांधी झोपडपट्टी,सोहेल जावेद शेख 19 रा.वाल्मिकी आवास योजना या दोघांन अटक करण्यात आली.त्यांच्याबरोबर आणखी तीन अल्पवयीनांनाही पकडण्यात आले आहे. या टोळीकडून सांगली शहर चार, विश्रामबाग दोन आणि संजय नगर पोलीस ठाण्याकडील एक असे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. मिरज शहर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी दोन घरफोडयातील एक अल्पवयीन पसार झाला आहे. या टोळीवर सांगली शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अमित पाटील, अमित परीट, मेघराज रूपनर, संदीप पाटील, विकास भोसले, शशिकांत जाधव,प्रकाश पाटील आदींनी ही कारवाई केली.

Related posts: