|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सिव्हिल सर्जनच्या बडतर्फीसाठी सांगलीतील महिला संघटना सरसावल्या,

सिव्हिल सर्जनच्या बडतर्फीसाठी सांगलीतील महिला संघटना सरसावल्या, 

प्रतिनिधी/ सांगली

म्हैसाळ ता.मिरज येथील डॉ.बाबासाहेब खिद्रापुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्त्राrभ्रुण हत्यामागील रॅकेट उघड करून या सर्व प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी. या मागणीसाठी मनसे,स्वाभिमानी विकास आघाडी  आणि एसएफआय यांच्यावतीने सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

म्हैसाळ येथे आत्तापर्यंत स्त्राr भ्रुण हत्येतील 19 पिशव्या पोलीसांनी जप्त केल्या आहेत.या प्रकरणातील संबधित डॉक्टरावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा केल्याचे सांगण्यात येते. पण  त्या 19 भ्रुण हत्येचे काय? याचा आणखी सखोल तपास होण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणात अनेक लोकांचे रॅकेट असण्याची शक्यता असून सदर प्रकरणातील डॉक्टर बीएचएमस पदवी घेतलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणात अन्य डॉक्टरांचा सहभाग आहे काय याचा तपास करून कारवाई करण्यात यावी. यातील गर्भलिंग तपासणीची यंत्रणा आहे किंवा नाही. नसल्यास कोणत्या हॉस्पिटलमधून ही तपासणी केली जाते. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी तसेच त्या भ्रुणांची डी.एन.ए. टेस्ट झाली पाहिजे. शासनाच्या वैद्यकीय यंत्रणेतील अधिकाऱयांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी मनसेच्या नेत्या ऍड.स्वाती शिंदे यांनी केली. यावेळी झालेल्या आंदोलनात सुनिता इनामदार,भाग्यश्री पाटील, प्राची कुदळे, शोभा चौगुले, चंदा मद्रासी, शैलजा मद्रासी, मंगल मोरे, लीना सावर्डेकर, आशा पवार, सरिता भोसले ,नंदा महाजन आदी सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्यावतीनेही याप्रकरणी सिव्हिल सर्जन साळुंखे तसेच म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडीकल ऑफीसर यांना  यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली असून याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी तसेच डॉ.खिद्रापुरे यांची संपत्ती जप्त तसेच त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा. अशी मागणी संघटनेचे सचिन खंबाळे, योगेश नाडकर्णी व निलेश शेंडगे यांनी केली आहे.

समतावादी महासंघाचे संदीप ठोंबरे, डॉ.शमा घाडगे, संगीता वैराळ, दिपाली माने, सुमित कदम यांनीही याप्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. तर स्वाभिमानी विकास आघाडीचे नगरसेवक गौतम पवार, सचिव सतिश साखळकर, आयुब पटेल, रेखा पाटील, राजकुमार राठोड, आशिष कोरी, चंद्रकांत सुर्यवंशी, उज्वल दिक्षीत,अभय खाडीलकर, अविनाश चौगुले, कुमार सुर्यवंशी, तानाजी सरगर यांनी गर्भलिंग करण्यास भाग पाडणाऱया लोकांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.तसेच या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी. अशी मागणी केली आहे.

Related posts: