|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सुनिल पाटील यांना राज्यस्तरीय शिवांजली पुरस्कार प्रदान

सुनिल पाटील यांना राज्यस्तरीय शिवांजली पुरस्कार प्रदान 

वार्ताहर/ कसबा वाळवे

शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट साहित्य परिषद चाळकवाडी ता. जुन्नर (पुणे) यांच्यावतीने नुकतेच दोन दिवसीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यामंदिर चांदेकरवाडीचे प्राथमिक शिक्षक, कवी सुनिल पाटील (मडिलगे बुद्रुक) यांना राज्यस्तरीय शिवांजली साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. स. काकडे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, शाल, ग्रंथसंपदा देऊन पाटील यांना गौरविण्यात आले. या प्रसंगी शिवांजली साहित्यपीठचे संस्थापक कवी शिवाजीराव चाळक, प्रा.तुकाराम पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रंगनाथ पठारे, कवी,समीक्षक डॉ.कैलास दौन्ड, संजय बोरुडे आदी मान्यवरांसह शिवांजली परिवारचे सदस्य उपस्थित होते. यापूर्वी त्यांनी अनेक नामांकित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचा आखील भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनात दोन वेळा सहभाग होता.