|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » कपिल शर्माच्या शोमध्ये नव्या पात्राची एन्ट्री

कपिल शर्माच्या शोमध्ये नव्या पात्राची एन्ट्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कपिल शर्माच्या विनोदी शैलीमुळे ‘द कपील शर्मा शो’ या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेतही दिवसोंदिवस वाढ होत आहे. पण कपिलसोबतच या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत त्याच्या सहकलाकारांचाही मोलाचा वाटा आहे. आता आणखी एका कलाकाराची कपिलच्या या शो मध्ये एन्ट्री झाली आहे.

आता कपिलच्या शो मध्ये झी टीव्हीच्या ‘गँगस ऑफ हसेपूर’ या कार्यक्रमाद्वारे प्रक्षेकांसमोर आलेला कलाकार डॉ. संकेत भोसलेसुद्धा दिसणार आहे. आतापर्यंत ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये कपिलसह सुनील ग्रोवर, किक्कू शारदा, सुगंधा मिश्रा आणि अली अजगर या कलाकारांनी विविध पात्रांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यातच आता संकेत भोसलेच्या नावाचाही समावेश झाला आहे. कपिलच्या चमूत हा नवा कलाकार अभिनेता संजय दत्तची आगदी हुबेहब नक्क करतो. त्यामुळे त्याला पाहताना काही क्षणांसाठी ‘अरे हा तर संजय दत्त’ असे म्हणन तुम्हीही थक्क व्हाल.

Related posts: