|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ग्रामसेवक पतसंस्थेच्या सभापतीपदी बाबासो कापसे

ग्रामसेवक पतसंस्थेच्या सभापतीपदी बाबासो कापसे 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी बाबासो धनपाल कापसे यांची तर उपसभापतीपदी अमित शिवाजी पाटील यांची निवड संस्थेच्या कार्यालयात झालेल्या सर्वसाधरण सभेमध्ये करण्यात आली. यावेळी सुकाणू समिती अध्यक्ष हंबीरराव पाटील, संघटना जिल्हाध्यक्ष एन. के. कुंभार, सात्ताप्पा मोहिते, काकासो पाटील, राजू भोजे, आर. डी. यादव, जयसिंग बिडकर, डी. एन. मोटूरे, जी. डी. आदलिंग, युवराज कांबळे, अशोक भोसले उपस्थित होते. संस्थेचे सचिव दिलीप पाटील यांनी आभार मानले.