|Thursday, November 14, 2019
You are here: Home » Top News » समझानेसे नही; बहकानेसे वोट मिलता है : अखिलेश

समझानेसे नही; बहकानेसे वोट मिलता है : अखिलेश 

ऑनलाईन टीम / लखनौ :

उत्तर प्रदेशातील भाजपाच्या यशानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपला पराभव स्वीकारत नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. समझानेसे नही बहकानासे वोट मिलता है, अशा शब्दांत त्यांनी भाजपाच्या विजयाची पत्रकार परिषदेत समीक्षा केली.

उत्तरा प्रदेशमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. तर सत्ताधारी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला मात्र फटका बसला आहे. राज्याच्या निकालानंतर अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत घेतली.

या वेळी बोलताना अखिलेश यांनी नवीन सरकारला शुभेच्छा देत आपल्याला पराभव मान्य असल्याचे सांगितले. आम्हाला पराभव मान्य आहे. सपा सरकारने अनेक विकासकामे केली. महामार्ग बांधले. पण, जनतेला बहुदा पक्क्या रस्त्यांपेक्षा बुलेट ट्रेनने अधिक भुरळ घातली असावी. आमच्यापेक्षा भाजप सरकार अधिक कामे करेल, अशी अपेक्षा आहे. समाझानेसे नही, शायद बहकानेसेही वोट मिलते है, अशा शब्दांत त्यांनी नाराजीचा सूरही आळवला.

मायावती यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, एखाद्या पक्षाने ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित केली असेल, तर सरकारने त्याची जरूर चौकशी करायला हवी. याबाबत मी आत्ताच बोलणार नाही. बूथ समीक्षेनंतरच यावर भाष्य करू. काँग्रेसच्या आघाडीमुळे समाजवादी पक्षाला लाभ झाला आहे. यापुढेही आघाडी राहणार, हे निश्चित आहे.

Related posts: