|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » उत्तरप्रदेशातील मतविभागणीचा भाजपला फायदा : पवार

उत्तरप्रदेशातील मतविभागणीचा भाजपला फायदा : पवार 

ऑनलाईन टीम / पुणे :

समाजवादी पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि अजितसिंगाचा पक्ष भाजपविरोधात वेगळे लढल्याने साहजिकच त्याचा लाभ भारतीय जनता पक्षाला झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

पाच राज्याच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि अजितसिंगांचा पक्ष हे भाजपविरोधात निवडणूक लढवत होते. त्यामुळे सहाजिकच उत्तरप्रदेशात मतविभागणी झाली. उत्तरप्रदेशमध्ये असा निकाल लागेल असे अपेक्षित होते. त्यामुळे आता हे यश मिळाल्याने त्यांनी आता विकासाकडे लक्ष द्यावे, असेही पवार म्हणाले.

Related posts: