|Monday, August 26, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » गुगलची डूडलच्या मध्यमातून अनोखी होळी

गुगलची डूडलच्या मध्यमातून अनोखी होळी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशभरात फाल्गुन पौर्णिमाच्या दिवशी होळीचा उत्सवव् मोठय़ा जल्लोषात साजरा केला जातो. यानंतर पुढे पाच दिवस वेगवेगळे उत्सव साजरा होत असतात. देशभरात साजऱया होणाऱया होळीच्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जात असतानाच याची गुगलनं देखील दखल घेतली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुगलनं स्पेशल डुडल तयार करून लहानग्यांसबोत होळी खेळली आहे.

विशेष म्हणजे गुगलकडून या डुडलचा एक व्हिडिओ व्हाययरल करण्यात आला आहे. त्या सर्वांना होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. व्हिडिओत लिहले आहे की, आम्ही होळीच्या शुभेच्छा देतोय, हिंदूंचा होळी सण भारत आणि नेपाळ मध्ये मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. आम्ही तुम्हाला 2017 या वर्षांत प्रेम आणि शांती नांदत राहण्याच्या शुभेच्छा देतो.