|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » उद्योग » बीएसएनएल देणार आता 4 जी सेवा

बीएसएनएल देणार आता 4 जी सेवा 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रिलायन्स जिओच्या प्रवेशानंतर देशातील 4जी सेवा वापरणाऱयांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली. मात्र अजूनही देशातील ग्रामीण भागात ही सेवा अपेक्षेप्रमाणे पोहोचली नाही. बीएसएनएल ही सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी वर्षाभरात 28 हजार मोबाईल टॉवर उभारणार आहे. या माध्यमातून ती आपली 2जी सेवा 3जीमध्ये बदलणार आहे. याचप्रमाणे 2017-18 मध्ये निवडक शहरांत 4जी सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.

आठव्या चरणानुसार देशातील 2जी सेवा आता आधुनिक बेस स्टेशनांमध्ये बदलण्यात येत आहे. 3जी आणि 4जी सेवा देण्याचा कंपनीचा विचार आहे. देशातील निवडक शहरांत 2017-18 मध्ये 4जी सेवा सुरू करण्यात येईल असा अंदाज आहे, असे बीएसएनएलचे प्रमुख अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटले. कंपनीच्या ताब्यात असणाऱया 3जी स्पेक्ट्रमचा वापर 4जी सेवा देण्यासाठी करण्याचा विचार आहे. यासाठी युरोपियन कंपनी नोकिया आणि एरिक्सन, याचप्रमाणे झेडटीई ही स्पर्धेत आहेत. बोली लावणाऱया कंपन्यांत नोकियाने सर्वात कमी लावली आहे. झेडटीई दुसऱया स्थानी आहे. या कंपन्यांच्या बोलींचा विचार करण्यात येत आहे. एप्रिलपर्यंत निविदेला अंतिम रुप देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: