|Saturday, December 7, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » बांगलादेशच्या पंतप्रधान पुढील महिन्यात भारतात

बांगलादेशच्या पंतप्रधान पुढील महिन्यात भारतात 

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना या 7 एप्रिल ते 10  एप्रिलपर्यंत भारत दौऱयावर असणार आहेत. त्यांचा हा दौरा दोन्ही शेजारी देशांमधील सहकार्य वृद्धींगत करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल असे बांगलादेश सरकारकडून मंगळवारी सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणानुसार हसिना या 7 वर्षांनंतर भारतात येणार आहेत.

8  एप्रिल रोजी दोन्ही नेते अधिकृत चर्चा करतील. आगामी दौरा हा बांगलादेश आणि भारत दरम्यान सलोख्याचे आणि सहकार्याचे नाते वृद्धिंगत करणारा आणि मैत्रीचे बंध आणखी घट्ट करणारा ठरेल असे दोन्ही देशांकडून जारी वक्तव्यात म्हटले गेले.

जानेवारी 2010 मध्ये हसीना यांनी अखेरचा भारत दौरा केला होता. जून 2015 मध्ये मोदींनी बांगलादेशला भेट दिल्याच्या 2 वर्षांनंतर हा दौरा होत आहे. हसिना या डिसेंबर 2016 मध्येच भारतात येणार होत्या, परंतु काही कारणाने तो लांबणीवर गेला. तिस्ता जलवाटप मुद्यावर चर्चेसाठी सुयोग्य वेळ नसल्याने हसीना यांनी दौऱयावर येणे टाळले अशी चर्चा होती.

विदेश सचिव एस. जयशंकर यांनी फेब्रुवारी महिन्यात हसिना यांची फेब्रुवारीमध्ये भेट घेतली होती, यानंतरच एप्रिल महिन्यात हा दौरा होईल अशी घोषणा झाली आहे.

भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रीगंला यांनी बांगलादेशचे विदेश सचिव शाहीदुल हक यांची सोमवारी भेट घेतली होती. शेजारी आणि मित्र देश असणाऱया बांगलादेशसोबत भारताची सर्वात लांब सीमा लागून आहे. दोन्ही देशांमधील भूमी तसेच सागरी मुद्दे लवकरच सोडविले जातील असे श्रीगंला यांनी म्हटले. दौऱयादरम्यान हसीना यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात वास्तव्याचे निमंत्रण दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

Related posts: