|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » गुन्हेगारीमुक्त समाजासाठी तरुणांचा पुढाकार घ्यावा – नंदकुमार मोरे

गुन्हेगारीमुक्त समाजासाठी तरुणांचा पुढाकार घ्यावा – नंदकुमार मोरे 

प्रतिनिधी / इस्लामपूर

समाजातील वाढती गुन्हेगारी केवळ पोलीस दलासाठीच नव्हे तर संपूर्ण सामाजव्यवस्थेसाठी डोकेदुखी बनु पाहत आहे. वेगवेगळ्या गुह्यातील तरुणांच्या सहभागाचे वाढते प्रमाण केवळ चिंतनीय नव्हे, तर चिंताजनक बनत चालले आहे, म्हणून गुन्हेगारीमुक्त आदर्श समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी तरुणांनी पुढाकार घेऊन समाजाला योग्य वळण देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कासेगाव पालीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नंदकुमार मोरे यांनी केले.

वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील आटर्स ऍण्ड कॉमर्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने कासेगाव पोलीस ठाण्याच्या सहकार्याने डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप या स्पर्धेच्या निमित्ताने सामजिक प्रबोधनात्मक चळवळी या विषयावर आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पत्रकार विजय लोहार, प्राचार्य डॉ.शिवाजी पवार यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान यावेळी वेगवेगळ्या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वाटेगाव हायस्कुल, वाटेगाव, आझाद विद्यालय नेर्ले, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय नेर्ले या तीन संघांनी सहभाग घेतला. वाटेगावच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. डॉ. माधुरी तानवडे, प्रा.शैलजा पाटील यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. प्रास्ताविक प्रा.शशिकांत मोहिते, यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.सुलाबाई मुंढे यांनी केले. तर आभार प्रा.शांताराम माळी यांनी मानले. यावेळी सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts: