|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मुख्याधिकारी बापटांना माहीती देण्याचा अधिकार नाहीच

मुख्याधिकारी बापटांना माहीती देण्याचा अधिकार नाहीच 

पंढरपूर / प्रतिनिधी :

पंढरपूर नगरपरिषदेंच्या कार्यालयील कामकाजांमधे सध्या पालिकेत असणा-या फ्ढलकांवर चक्क अपिलीय अधिकारी म्हणून सुमारे आठ ते नउ महीनापूर्वी बदलीहून गेलेले पालिकेचे पूर्व मुख्याधिकारी शंकर गोरे यांचेच नाव अद्यापही झळकत आहे. त्यामुळे विद्यमान मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना अजूनही माहीती अधिकारात माहीती देण्यांचा ‘अधिकार’ पालिकेने दिला नाही का ? असा सवाल सध्या पुढे येत आहे.

   येथील पालिकेमधे प्रवेश केल्यावर पहील्या मजल्यावर नागरिक सुविधा केंद्रानजीक असणा-या माहीती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी यांच्या माहीतीचा फ्ढलक आहे. यामधे पालिकेचे पूर्व मुख्याधिकरी शंकर गोरे यांचे नाव मोठया दिमाखात झळकत आहे.

  वास्तविक पाहीले तर साधारणपणे 15 जूनच्या आसपास शंकर गोरे हे पंढरपूर नगरपरिषदेंमधून बदलीहून सातारा पालिकेत मुख्याधिकारी म्हणून गेल. तर 22 जूनच्या आसपास मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी पंढरपूर नगरपरिषदेंचा पदभार स्विकारला. यापूर्वी बदलींचे आदेश प्राप्त झाल्यानंतर अभिजीत बापट यांनी 16 जून रोजी पंढरपूरात येउन येथील पालिकेची तसेच इतरही शहरांची पाहणी करून अभ्यास करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर पालिकेचा पदभार घेतल्यावर  तर प्रशासन सुधारणेकडे त्यांनी  कल दिला. तसेच शहरांच्या विकासत आणि विकासकामंतही मोठी ‘ रूची ’ घेउन काम करण्यास सुरूवात केली. यामधे स्वच्छतेचे काम ते अतिशय चांगल्या पध्दतीने करताना दिसत आहे. यामधे त्यांनी पालिकेंच्या इमारतींची तसेच इतरही फ्ढलकांची साफ्ढसफ्ढाई कदाचित केलेली दिसत नाही. यांचाच परिणाम म्हणून आजही पालिकेचे माहीती अधिकारांतर्गत अपिलीय अधिकारी म्हणून पुर्व मुख्याधिकारी शंकर गोरे यांचे नाव झळकताना दिसत आहे.

   माहीती अधिकारांच्या प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून सध्या ज्या पध्दतीने शरद कुलकर्णी यांचे नाव झळकत आहे. अगदी त्याच पध्दतीने प्रशासन विभागाचे अधिकारी म्हणूनही श्री बा.शं कदम यांचे नाव फ्ढलकांवर झळकत आहे. वास्तविक पाहीले तर सध्या प्रशासन अधिकारी म्हणून शरद कुलकर्णी कार्यरत असताना दिसत आहे. त्यामुळे दोन मोठया दुरूस्त्या या माहीती अधिकारांच्या फ्ढलकांवर दिसून येत आहे.

Related posts: