|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » करवाढीमुळे पालिकेच्या उत्पन्नात 35 लाखांची भर

करवाढीमुळे पालिकेच्या उत्पन्नात 35 लाखांची भर 

सावंतवाडी : सावंतवाडी पालिकेने करवसुली मोहीम तीव्र केली असून शुक्रवारी शहरात काही दुकाने सील करण्यात आली. नगरपालिका प्रशासनाकडून करवसुलीचा रोजच्या रोज आढावा घेतला जात आहे. दरम्यान, पालिकेने करवाढीचा निर्णय घेतल्यामुळे खजिन्यात 35 लाखांची भर पडणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले.

मार्चअखेरीच्या पार्श्वभूमीवर थकित कर आणि भाडेवसुलीसाठी पालिकेचे पथक कार्यान्वित झाले आहे. या पथकाने थकित भाडे असणाऱया पालिकेच्या मालमत्ता असलेल्या इमारतीतील काही दुकानांना सील केले आहे. तसेच थकित करापोटी लाखो रुपयांची वसुली करण्यास सुरुवात केली आहे.

नगराध्यक्ष साळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नगरविकास विभागाचे संचालक वीरेंद्र सिंग यांच्याकडून दररोज राज्यातील 288 पालिकांच्या वसुलीचा आढावा घेतला जात आहे. वसुली झाली नाही तर मालमत्तांवर कोणती कारवाई केली, याचा अहवाल द्यावा लागत आहे. त्यामुळे पालिकेलाही यात हस्तक्षेप करता येत नाही.

शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. अन्य ठिकाणच्या पालिकांनाही कचऱयाचा प्रश्न भेडसावत आहे. मात्र, इतरांच्या तुलनेत आम्ही कचरा नियोजनाबाबत खूपच पुढे आहोत. गांडूळ खत हाच एक योग्य पर्याय आहे. यापूर्वी पालिकेने असा प्रयोग राबविला. त्यातील त्रुटी दूर करण्याचा
प्रयत्न आहे. त्यादृष्टीने पालिकेचे नियोजन सुरू असल्याचे साळगावकर यांनी सांगितले.

Related posts: