|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » रंगी रंगला श्रीरंग….

रंगी रंगला श्रीरंग…. 

पंढरपूर / प्रतिनिधी

  अवघा रंग एक झाला / रंगी रंगला श्रीरंग अशा अभंगाच्या ओळीची प्रचिती देणारे सावळया विठरायुचे आज रंगपंचमीचे रूप शोभून दिसून येत होते.

    आज रंगपचंमीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठुरायांलाही रंग लावून रंगपंचमी साजरी करण्यात आली. साधारणपणे सकाळी  11 वाजाता महानैवैद्याच्यावेळी केशर मिश्र असलेला नैसर्गिक रंग आणि गुलाल वापरून विठुरायांची रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी विठठलांस पांढरा शुभ्र वेश परिधान करण्यात आला होता.

रंगपंचमी निमित्त दिवसभर मोठया प्रमाणात अनेक भाविकांनी रंग घेउन विठठलांचे दर्शन घेण्यास गर्दी केली होती. यामधेच दुपारी चारच्या दरम्यान परंप्रमाणे विठठलांचा मंदिर समितीच्या वतीने ‘डफ्ढ’ मिरवणुकीसाठी नामदेव पायरी येथून निघाला. (डफ्ढ अर्था त रंगाच्या डफ्ढलींची मिरवणुक) त्यानंतर शहरांतील ठरलेल्या मार्गावरून डफ्ढांची मिरवणुक निघाली. त्यानंतर चंद्रभागा येथे डफ्ढाला स्नान घालून डफ्ढांची आणि रंगपंचमीची सांगता झाली. सदरच्या डफ्ढामधे साक्षात विठठल येउन भाविकांसोबत आणि पंढरपूरकरासोबत रंग खेळत असल्यांची भावना आहे. त्यामुळे या डफ्ढांच्या मिरवणुकींलाही मोठया प्रमाणावर भाविकांची गर्दी झालेली दिसून येत असते.

मंदिर समितीच्या डफ्ढांप्रमाणे परंपरागत येथील श्री बडवे आणि उत्पात समाजाचे देखिल दुपारी चारच्या दरम्यान डफ्ढ निघाले. डफ्ढ हा निघाल्यापवर शहरांच्या भागात आणि प्रदक्षिणा मार्गाच्याही भागत फ्ढिरत असताना भाविकांकडून तसेच नागरिकांकडून या डफ्ंढावर रंगाची उधळण होते. सदरच्या डफ्ढांची मिरवणुक ही झेंडे , अबदागि-या अशा शाही लवाजम्यान वाजत गाजन निघत असते. आणि यानंतर पंढरपूरातील रंगपंचमीची सांगता होते.

    विठठलांस रंगपंचमीदिवशी पांढरा शुभ्र पोशाख परिधान केलेला असतो. सदरचा पोशाख हा गत महीन्यातील वसंतपंचमीपासून सुरू करण्यात येत असतो. वसंतपंचमीला विठठलांचा विवाह झाल्यावर रंगपंचमीपर्यत वसंत ऋतुला आलेल्या बहरांमधे थोडी थंडी आणि थोडा उन्हाळा देखिल असतो. अशामधे विठठलांस सुती पांढरा शुभ्र पोशाख घालून वातावरणापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला जात असतो. असे जाणकार सांगातत. त्यामुळेच पांढरा शुभ्र पोशाख परिधान केलेला असतो. मात्र आज रंगपंचमीच्या रंगाच्या उधळणीनंतर पांढरा शुभ्र पोशाख बंद करून शनिवारपासून रंगीन पोशाख वापरण्यास सुरूवात केली जात असते.

  एकंदरीतच रंगपंचमीचा उत्साह पाहीला तर विठठलाच्या रंगपंचमीसोबतच डफ्ढामधेही मोठया प्रमाणांवर भाविकांची गर्दी दिसून येते. यामुळे विठठलांच्या रंगामधेच अवघा रंग एक होउन पंढरीत येणारा प्रत्येक भाविक तथा श्रीरंग हा येथीलच रंगात रंगलेला दिसून येतो. 

 

Related posts: