|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » विधानसभेचे कामकाज 12 पर्यंत तहकुब

विधानसभेचे कामकाज 12 पर्यंत तहकुब 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्याचा आर्थसंकल्प आज सादर होणार असून यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱयांच्या कर्जमाफीचा प्रश्न चांगलाच पेटलेला पहायला मिळत आहे. विरोधकांनी शेतकऱयांच्या कर्जमाफीवरून आक्रमक भूमिका घेतल्याने विधानसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले.

विरोधकांनी पुन्हा एकदा विधानसभवनाच्या पायऱयांवर आंदोलन केले. मंत्री आणि आमदार विधानभवनात प्रवेश करत असताना काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. हात हलवत आले… दिल्ली वरून आले.. हात हलवत आले.. नागपूरचा पोपच काय म्हणतो.. कर्जमाफी नाय म्हणतो.. अशा घोषणा देत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले तर शिवसेनेछया मंत्र्यांना बघून… काढले…काढले.. येडय़ात काढल.., अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या.