|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » औरंगाबादेत राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारणार : अर्थमंत्री

औरंगाबादेत राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारणार : अर्थमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 39 कोटी 28 लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे. याचबरोबर चंद्रपूर येथे सैनिकी स्कूल स्थापन केली जाणार आहे, यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या शतकपूर्तीनिमित्त नामकरण सोहळ्यासाठी 25 कोटी रुपये दिले जाणार आहेत. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी 40 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील 1 लाख 22 हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. राज्यातील तरुणांसाठी प्रमोद महाजन कौशल्स विकास उद्योजकता योजना सुरु केली जाणार आहे.

Related posts: