|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » रियल माद्रीद- बायर्न म्युनिच यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत

रियल माद्रीद- बायर्न म्युनिच यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत 

वृत्तसंस्था/ नेयॉन

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विद्यमान विजेता रियल माद्रीदची गाठ बायर्न म्युनिच संघाबरोबर होणार आहे. तसेच ज्युव्हेटंस् आणि बार्सिलोना यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना खेळविला जाईल.

 

युरोपियन टॉप टियर फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे सामने अटीतटीचे होतील. इंग्लीश चॅम्पियन्स लिसेस्टर संघाचा उपांत्यपूर्वचा पहिला सामना ऍटलेटिको माद्रीद संघाबरोबर होईल. तर फ्रान्सचा मोनॅको व बोरूसिया डॉर्टमंड यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची चौथी लढत होईल. कार्लो ऍनसिलॉटच्या बायर्न म्युनिच संघाने 2014 साली 10 व्यांदा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. त्यावेळी रियल माद्रीदचे नेतृत्व ऍनसिलॉट यांनी केल होते. बार्सिलोना आणि ज्युव्हेटंस् यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीची लढत चुरशीची अपेक्षित आहे. या सामन्यात बार्सिलोनाची भिस्त प्रामुख्याने मेसीवर राहील.

उपांत्यपूर्व पहिल्या टप्प्यातील लढती 11 आणि 12 एप्रिलला तर दुसऱया टप्प्यातील लढती 18 आणि 19 एप्रिलला खेळविल्या जातील. उपांत्य फेरीचा ड्रॉ 21 एप्रिलला काढण्यात येणार असून उपांत्य फेरीचा पहिला टप्पा 2-3 मे रोजी तर उपांत्य फेरीचा दुसरा टप्पा 9-10 मे रोजी आणि अंतिम सामना 3 जूनला कार्डीफ येथे खेळविला जाईल.

कुझेनत्सोव्हा- व्हेस्निना