|Friday, January 24, 2020
You are here: Home » क्रिडा » फेडरर-वावरिंकात अंतिम लढत

फेडरर-वावरिंकात अंतिम लढत 

वृत्तसंस्था / इंडियन वेल्स

एटीपी टूरवरील इंडियन वेल्स बीएनपी पेरीबस खुल्या हार्ड कोर्टवरील पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर आणि स्टॅनिसलास वावरिंका यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.

शनिवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने अमेरिकेच्या जॅक सॉकचा 6-1, 7-6 (7-4) असा पराभव केला. गेल्या जानेवारीत फेडररने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. फेडररने आतापर्यंत 18 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. शनिवारच्या उपांत्य सामन्यात फेडररने पहिला सेट केवळ 20 मानिटात जिंकला. त्यानंतर सॉकने दुसरा सेट टायब्रेकरपर्यंत लांबविला तर फेडररने अनुभवाच्या जोरावर सॉकचे आव्हान संपुष्टात आणले. दुसऱया उपांत्य सामन्यात स्वित्झर्लंडच्या वावरिंकाने स्पेनच्या पाबेलो बुस्टाचा 6-3, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. वावरिंका आणि फेडरर यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. उभयतामध्ये आतापर्यंत 22 सामने झाले असून फेडररने 19 तर वावरिंकाने 3 सामने जिंकले आहेत.

Related posts: