|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » मणिपुरात बिरेनसिंहच ; बहुमत सिद्ध

मणिपुरात बिरेनसिंहच ; बहुमत सिद्ध 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय जनता पक्षाने मणिपूर विधानसभेत बहुमत सिद्ध केल्याने मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह हेच मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 32 आमदारांच्या पाठिंब्यावर त्यांनी बहुमत सिद्ध केले.

मणिपूर विधानसभेच्या 60 जागांपैकी काँग्रेसला 28 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 21 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करेल. अशी शक्यता होती. मात्र, भारतीय जनता पक्षाने छोटय़ा पक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेच्या हालचाली केल्या. तसेच एन. बिरेनसिंह यांना मुख्यमंत्रिपदाची शपथही देण्यात आली. त्यानंतर त्यांना राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. अखेर बिरेनसिंह यांनी 32 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यामुळे बिरेनसिंह हेच मुख्यमंत्री असणार हे स्पष्ट झाले आहे.

Related posts: