|Monday, June 24, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » भारतीयांना हल्ल्यांपासून बचाव करणाऱया ‘त्या’ तरुणाचा सत्कार

भारतीयांना हल्ल्यांपासून बचाव करणाऱया ‘त्या’ तरुणाचा सत्कार 

ऑनलाईन टीम / कान्सास :

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील भारतीयांवर सातत्याने होत असलेले हल्ले हा एक चिंतेचा विषय बनला आहे. भारतीयांच्या बचावार्थ गोळीबारात आपल्या जीवाची बाजी लावणाऱया भारतीय असलेल्या इयान ग्रिलटचा सत्कार करण्यात येणार आहे.

मागील महिन्यात अमेरिकेतील कान्सास शहरातील बारमध्ये एका किरकोळ भांडणातून संतप्त अमेरिकी नागरिकाने दोन भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचिभोतला आणि आलोक मदासनीर यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात कुचिभोतला यांचे निधन झाले. हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारात कदाचित आलोक मदासनी यांचाही मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण घटनास्थळी उपस्थित अमेरिकी नागरिक इयान ग्रिलट याने आपल्या जीवाची पर्वा न करता अलोक मदासनी यांची मदत केली. मदासनी यांना वाचवताना ग्रिलट हे जखमी झाले. त्यांच्या धाडसीपणाचा गौरविण्यात येणार आहे.