|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीनमधील नदीच्या तळाशी मिळाला मोठा खजिना

चीनमधील नदीच्या तळाशी मिळाला मोठा खजिना 

बीजिंग

 चिनी पुरातत्व तज्ञांना तेथील दक्षिण-पश्चिम प्रांत सिचुआनच्या एका नदीत 300 वर्षांपूर्वी बुडालेला खजिना मिळाला आहे. खजिन्यात सोने आणि चांदीच्या 10 हजारपेक्षा अधिक वस्तू सामील आहेत. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने प्रांतीय सांस्कृतिक अवशेष आणि पुरातत्व संशोधन संस्थेचे संचालक गाओ डालून यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. खजिन्यात सापडलेल्या वस्तूंमध्ये सोने, चांदी, तांब्याची नाणी आणि दागिन्यांबरोबरच लोखंडी शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. या शस्त्रास्त्रांमध्ये तलवार, चाकू आणि भाले असल्याचे डालून यांनी सांगितले. याशिवाय सोने आणि चांदीची भांडी देखील आढळली आहेत. मिंजियांग नदीत हे उत्खनन सिचुआनची राजधानी चेंगदूपासून 50 किलोमीटर अंतरावर करण्यात आले होते. 1646 साली शेतकरी क्रांतीचे नेते झांग शिनझोंग यांना ते आपला खजिना दक्षिण चीनकडे नेत असताना मिंग वंशाच्या सैनिकांनी पराभूत केले होते असे मानले जाते. जवळपास 1 हजार नौकांवर लादून नेली जात असलेली नाणी आणि मौल्यवान वस्तू लढाईवेळी बुडाल्या होत्या.