|Sunday, January 26, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » गुजरात निवडणुकीत भाजपकडून नसणार मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार

गुजरात निवडणुकीत भाजपकडून नसणार मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार 

अहमदाबाद

 उत्तरप्रदेशात भाजपच्या दिमाखदार विजयानंतर गुजरातमध्ये पक्षाने निवडणुकीच्या तयारीस प्रारंभ केला आहे. पक्ष नेत्यांमध्ये दोन फॉर्म्यूल्यावर सहमती बनताना दिसून येत आहे. पक्ष यावेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाही करणार नाही. जर असे झाले तर 1995 नंतर पहिल्यांदाच भाजप मुख्यमंत्र्याच्या चेहऱयाशिवाय निवडणूक लढवेल. तर दुसरा फॉर्म्यूला सत्तेवर आल्यास उपमुख्यमंत्री नेमण्याबद्दल आहे. भाजप पूर्ण निवडणूक उत्तरप्रदेशच्या धर्तीवर लढू इच्छितो. याचमुळे भाजपने ‘यूपीत 300, गुजरातमध्ये 150’चा नारा दिला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा न करण्याचे मोठे कारण पक्षातील वाढती गटबाजी आहे. कोणत्याही एकाच्या नावावर निवडणूक लढविली जावी असे भाजप नेतृत्वाला वाटत नाही. जर असे झाले तर पक्षाला अंतर्गत बंडाळीमुळे नुकसान होऊ शकते अशी भीती नेतृत्वाला वाटत आहे. भाजपने गुजरातमध्ये पहिल्यांदा 1995 साली मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा न करता निवडणूक लढविली होती. विजयानंतर केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले होते.

Related posts: