|Monday, December 16, 2019
You are here: Home » क्रिडा » रशियाची व्हेस्निना अजिंक्य

रशियाची व्हेस्निना अजिंक्य 

वृत्तसंस्था / इंडियन वेल्स

रशियन महिला टेनिसपटू इलेना व्हेस्निनाने रविवारी येथे इंडियन वेल्स बीएनपी पेरीबस खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना आपल्याचे देशाच्या अनुभवी कुझेनत्सोव्हाचा पराभव केला.

सुमारे तीन तास चाललेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात व्हेस्निनाने कुझेनत्सोव्हाचा 6-7 (6-8), 7-5, 6-4 असा पराभव केला. या विजयामुळे 30 वर्षीय व्हेस्निनाला महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत 13 वे स्थान मिळाले. व्हेस्निनाने यापूर्वी म्हणजे 2013 साली डब्ल्यूटीए टूरवरील इस्टबोर्न आणि होबार्ट येथील स्पर्धा जिंकल्या होत्या. कुझेनत्सोव्हाने इंडियन वेल्स स्पर्धेत तिसऱयांदा अंतिम फेरी गाठली होती.

Related posts: