इंडियन वेल्स स्पर्धेत फेडरर विजेता

वृत्तसंस्था / इंडियन वेल्स
स्वित्झर्लंडच्या 35 वर्षीय रॉजर फेडररने रविवारी येथे एटीपी टूरवरील इंडियन वेल्स बीएनपी पेरीबस खुल्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना आपल्याच देशाच्या स्टॅनिसलास वावरिंकाचा सरळ सेटस्मध्ये पराभव केला.
रॉजर फेडररने अंतिम सामन्यात वावरिंकाचा 6-4, 7-5 असा पराभव करून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पाचव्यांदा विक्रमी विजेतेपद मिळविताना अमेरिकेच्या जिमी कॉर्नर्सला मागे टाकले. ही स्पर्धा जिंकणारा फेडरर हा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी म्हणजे 1984 साली जिमी कॉर्नर्सने 31 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. फेडररने या स्पर्धेत आणखी एका विक्रमाशी बरोबरी साधली आहे. सर्बियाच्या जोकोव्हिकने ही स्पर्धा पाचवेळा जिंकली असून फेडररने त्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.