|Monday, December 16, 2019
You are here: Home » क्रिडा » फेडररची सहाव्या स्थानी झेप

फेडररची सहाव्या स्थानी झेप 

वृत्तसंस्था’ / पॅरिस

एटीपीने जाहीर केलेल्या ताज्या मानांकन यादीत स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने एकदम सहा स्थानांची झेप घेताना त्याचा प्रतिस्पर्धी राफेल नादाललाही मागे टाकले आहे.

मंगळवारी एटीपीने ताजी क्रमावारी जाहीर केली. इंडियन वेल्स येथे झालेल्या स्पर्धेत फेडररने नादालला चौथ्या फेरीतच हरविले आणि नंतर स्पर्धेचे जेतेपदही पटकावले. अंतिम फेरीत त्याने आपल्याच देशाच्या स्टॅनिसलास वावरिंकाचा पराभव केला. या जेतेपदाच्या त्याला फायदा झाला असून पुन्हा टॉप-10 मध्ये प्रवेश केला आहे. ताज्या क्रमवारीत फेडरर सहाव्या स्थानी आहे. ब्रिटनच्या अँडी मरेने ताज्या मानांकनात अग्रस्थान कायम ठेवले असून इंडियन वेल्समध्ये तो दुसऱया फेरीतच पराभूत झाला होता. सर्बियाच्या नोव्हॅक ज्योकोव्हिकलाही इंडियन वेल्समध्ये लवकर पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्याने दुसरे स्थान कायम राखले आहे तर वावरिंका तिसऱया स्थानावर आहे. इंडियन वेल्समध्ये उपांत्यपूर्व फेरीतच गारदा होणाऱया नादालची एका स्थानाने घसरण झाली असून तो आता सातव्या स्थानी आहे.

ताजी एटीपी क्रमवारी –

1) अँडी मरे (इंग्लंड) – 12,005 गुण

2) नोव्हॅक ज्योकोव्हिक (सर्बिया) – 8915 गुण

3) स्टॅन वावरिंका (स्वीत्झर्लंड) – 5705 गुण

4) केई निशिकोरी (जपान) – 4730 गुण

5) मिलोस रेऑनिक (कॅनडा) – 4480 गुण

6) रॉजर फेडरर (स्वीत्झर्लंड) – 4305 गुण

7) राफेल नादाल (स्पेन) – 4145 गुण

8) डॉमनिक थिएम (ऑस्ट्रिया) – 3465 गुण

9) मारिन सिलिक (क्रोएशिया) – 3420 गुण

10) ज्यो विल्प्रेड त्सोंगा (फ्रान्स) – 3310 गुण.

 

Related posts: