|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » sमहाराष्ट्र पीएचडी चेंबर मधील सहयोग उद्योगवाढीस उपयुक्त-प्रभु

sमहाराष्ट्र पीएचडी चेंबर मधील सहयोग उद्योगवाढीस उपयुक्त-प्रभु 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

महाराष्ट्रातील व्यापार-उद्योग क्षेत्रातची सर्वात जुनी शिखर संस्था म्हणुन कार्यरत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स  अँड इंडस्ट्रीज’ व राष्ट्रीय स्तरावर 104 वर्षापासून कार्यरत पीएचडी चेंबरमधील सहयोगाचे पर्व महाराष्ट्रातील उद्योगवाढीसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

रेल्वे भवन, नवी दिल्ली येथे ‘महाराष्ट्र चेंबर’ व ‘पीएचडी चेंबर’ या दोन शिखर संस्थांनी आपापसात सहयोग करण्यासाठीच्या सामंजस्य करारावर सहय़ा केल्या. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष शंतनु भडकमकर व पीएचडी चेंबरचे अध्यक्ष गोपाल जिवराजका यांनी सामंजस्य करारावर सहय़ा केल्या.

रेल्वेमंत्री प्रभू पुढे म्हणाले की, पीचएडी चेंबर देशभरात विशेषतः उत्तर भारतात अतिशय सक्षम असून, संशोधन क्षेत्रातील तसेच रेल्वेला लागणाऱया यंत्रसामुग्रीसाठी पुरवठादार उत्पादकांची यंत्रणा विकसीत करण्याचे महत्वपूर्ण कार्य हे चेंबर करीत आहे. या अनुभवाचा फायदा महाराष्ट्रातील एकंदरीत उद्योगवाढीबरोबरच रेल्वेसाठी लागणाऱया उत्पादानासाठीची क्षमता महाराष्ट्रात विकसीत करण्यासाठी उपयोग होईल.

पीएचडी चेंबरचे अध्यक्ष गोपाल जीवराजका यांनी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी लागणारे सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

महाराष्ट्र चेंबरतर्फे अध्यक्ष शंतनु भडकमकर यांनी महाराष्ट्र 90 वर्षातील योगदानाची माहिती दिली. महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गास मंजुरी दिल्याबद्दल सुरेश प्रभू यांचे अभिनंदन केले. तसेच कोल्हापूर-पुणे-रेल्वेमार्ग दुहेरीकरण विद्युतीकरणास गती देण्याची मागणी करून महाराष्ट्रातील रेल्वेच्या विकासासाठीच्या प्रश्नांची माहिती दिली.

याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिल लोढा, समीर दुधगावकर, माजी अध्यक्ष खुशालभाई पोददार, चेंबरचे सेक्रेटरी सागर नगारे, पीएचडी चेंबरचे महाव्यवस्थापक सौरभ संन्याल तसेच पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.