|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » असदुद्दीन ओवेसींना संसद परिसरात मारहाण

असदुद्दीन ओवेसींना संसद परिसरात मारहाण 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुसलिमीन (एमआयएम)चे संस्थापक अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांना संसद परिसरात मारहाण करण्यात आली. मारहाण करणारा व्यक्ती शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे.

खर्जुल हा खासदार गोडसे यांचा कार्यकर्ता असून, तो गोडसे यांच्या माध्यमातून संसद परिसरात आला होता. ओवेसी हे संसद परिसरातून जात असताना गोरख खर्जुल या व्यक्तीने त्यांना कानाखाली लगावली. कट्टर हिंदूत्त्ववादी असल्याने मी ओवेसींवर मारहाण केल्याचे खर्जुल याने सांगितले. दरम्यान, मारहाणीचा असा कोणताही प्रकार घडला नसून, केवळ प्रसिद्धसाठी खोटे दावे केले जात आहेत, अशा शब्दांत ओवेसींनी मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळले.