|Thursday, August 22, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » मुस्लिम मुलीच्या शिक्षणासाठी पंतप्रधानांचा मदतीचा हात

मुस्लिम मुलीच्या शिक्षणासाठी पंतप्रधानांचा मदतीचा हात 

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :

सध्या शिक्षणाचे महत्त्व वाढत चालले आहे. तरूण-तरूणींनी शिक्षण घ्यावे, यासाठी सरकारदेखील अनेक योजना राबवत आहे. तसेच गरिबांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सदैव तत्पर असतात. गेल्या काही दिवसांपासून गरिबीमुळे एमएबीएचे शिक्षण घेण्यात अडचणी येत असलेल्या 21 वर्षीय सारा या मुस्लिम मुलीला पंतप्रधानांकडून शिक्षणासाठी मदतीचा हात देण्यात आला आहे.

मदत मिळावी यासाठी त्या तरुणीने पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. माझ्या वडिलांना आठ महिने पगार मिळाला नाही. त्यामुळे एमबीएची फी भरण्यासाठी मला पैशांची गरज आहे. असे तिने पत्रात नमूद केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 दिवसांच्या आत त्या मुस्लिम तरुणीला प्रतिसाद दिला असून, तिला 1.5 लाखांचे एज्युकेशन लोनही मंजूर झाले आहे.

कर्नाटकमधील मांडय़ा येथे राहणाऱया सारा या मुलीचे वडील एका कारखान्यात कामाला आहेत. मात्र, कारखानदारांनी त्या तरुणीला आठ महिन्यांचा पगारच दिला नाही. तिला एमएबीएचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्ज हवे होते. मात्र, बँकांनी तिला हप्ते भरण्यास कार्यक्षम नसल्याने कारण देत कर्ज नाकारले होते. त्यामुळे साराने पंतप्रधानांना पत्र लिहून मदतीची मागणी केली होती. पंतप्रधानांनी साराच्या पत्राची दखल घेत तिला शैक्षणिक कर्ज मंजूर झाले आहे.

याबाबत सारा म्हणाली, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठय़ा आशेने पत्र पाठवले होते. मात्र, त्याला एवढय़ा लवकर प्रतिसाद मिळेल, अशी आशा नव्हती. मोदींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून 10 दिवसांत पत्राला उत्तर दिले. मोदींच्या मदतीमुळे माझे एमबीएचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.