|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » सरकारने 19 आमदारांचे कत्तल केले : उद्धव ठाकरे

सरकारने 19 आमदारांचे कत्तल केले : उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महराष्ट्रात रोज होणाऱया शेतकऱयांच्या आत्महत्या या सरकारच्या निष्काळजीपणामुळे होणाऱया ‘हत्या’च आहेत, शेतकऱयांच्या कर्जमाफीची मागणी करणाऱया 19 आमदारांची झालेली ‘कत्तल’हे संसदीय नियमास धरून आहे, पण लोकभावनेच्या विरोधात आहे. विरोधकांचा मार्ग चुकला आहे. पण सरकारची दिशा तरी कुठे बरोबर आहे?अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या आग्रलेखातून सरकारवर तोफ डागवली आहे.

गोंधळ घालणाऱया आमदारांची निलंबन केल्याबद्दल सरकारचे कौतुक करावे काय? असा प्रश्न राज्यातील तमाम शेतकऱयांना आज पडला असेल. कर्जमुक्ती करता येणार नाही, देशाची अर्थिक शिस्त बिघडेल असे स्टेट बँकेच्या अध्यक्ष श्रीमती अरूंधती भट्टाचार्य आता सांगतात, पण उत्तर प्रदेशसारख्या 22 कोटी लोकसंखेच्या राज्यातही ‘सत्तेवर असल्यास कर्जमुक्ती करू’ असे आश्वाशन भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात आणि पंतप्रधानांच्या भाषणात आहे. श्रीमती भट्टाचार्य यांना विचारून हे आश्वासन दिले होते काय?असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे.

Related posts: