|Sunday, June 16, 2019
You are here: Home » उद्योग » ‘तिकोना’ची 4 जी सेवा एअरटेलकडून खरेदी

‘तिकोना’ची 4 जी सेवा एअरटेलकडून खरेदी 

1,600 कोटी रुपयांना व्यवहार : जिओला स्पर्धा देण्यास होणार मदत

वृत्तसंस्था/ मुंबई 

तिकोना डिजिटल नेटवर्कच्या 4जी सेवेसह ब्रॉडबॅन्ड वायरलेस एक्सेस स्पेक्ट्रमची खरेदी करण्यासाठी भारती एअरटेलने निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. पाच दूरसंचार सर्कलमधील हा व्यवसाय 1,600 कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणार आहे. आयडिया आणि व्होडाफोन यांच्या विलीनीकरणानंतर दूरसंचार क्षेत्रात हे दुसऱया क्रमांकाचे विलीनीकरण आहे. रिलायन्स जिओचा प्रवेश झाल्याने 4जी डेटा दर आणि वेगामुळे मागे पडत असल्याने कंपनीने मोठा व्यवहार करण्याचा निर्णय घेतला.

तिकोनाच्या गुजरात, उत्तर प्रदेश पूर्व, उत्तर प्रदेश पश्चिम आणि हिमाचल प्रदेश या सर्कलमधील व्यवसायाचे अधिग्रहण एअरटेलकडून करण्यात येणार आहे. तिकोनाच्या राजस्थानमधील व्यवसायाचे अधिग्रहण एअरटेलची उपकंपनी भारती हेक्साकॉम लिमिटेड ही करणार आहे. या पाच सर्कलमध्ये 2,300 मेगाहर्ट्ज बॅन्डमधील 20 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमचा तिकोनाकडे ताबा आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्पेक्ट्रम लिलावामध्ये या पाच सर्कलमध्ये व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एअरटेल कंपनीकडून अनेक पावले उचलण्यात आली आहेत.

टीडी-एलटीई आणि एफडी-एलटीईमुळे एअरटेलची क्षमता वाढविण्यास मदत होईल. ग्राहकांना अतिवेगवान सेवा मिळण्यास मदत होईल असे कंपनीला वाटते, असे एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक गोपाल विठ्ठल यांनी म्हटले.